परळी: पांगरी येथील वाण नदीवर असलेला पर्यायी पूल गेला वाहून
Parli, Beed | Aug 24, 2024 बीड जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला असून,परळी तालुक्यातील परळी-बीड मार्गावर पांगरी येथे असलेला पर्यायी पूल, वाण नदीला पूर आल्याने शनिवार दि.24 ऑगस्ट रोजी पहाटे 5 च्या सुमारास वाहून गेला आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक दिवसभर ठप्प राहण्याचे संकेत आहेत. वाण नदी, भागात पावसाचा जोर कायम असून हा पाऊस दिवसभर असाच राहिला तर, पर्यायी पूल दुरुस्त करणे शक्य होणार नाही. त्यामुळे तुर्तास हा मार्ग दिवसभर बंद, राहणार आहे. याची प्रवाशांनी नोंद घ्य