जालना: चंदनझिरा पोलिसांची दुहेरी कारवाई; 1 लाख 3 हजार 800 रुपयांचा दारूसाठा व वाहने जप्त
Jalna, Jalna | Jun 2, 2026 अवैध दारू विक्रीविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत चंदनझिरा पोलिसांनी दोन स्वतंत्र कारवाया करत 1 लाख 3 हजार 800 रुपयांचा दारूसाठा व वाहने जप्त केली आहेत. मंगळवार दि. 2 जून 2026 रोजी दुपारी 4 वजाता मिळालेल्या माहितीनुसार या प्रकरणी दोघांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या अवैध धंद्यांविरोधातील मोहिमेदरम्यान पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांना गुप्त माहिती मिळाली होती.