घरात कोणीही नसल्याचा गैरफायदा घेत अज्ञात व्यक्तीने घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करत लोखंडी ड्रम मध्ये ठेवलेली एकूण एक लाख 80 हजार रुपयाची रोख रक्कम चोरून नेल्याची घटना घडली ही घटना तारीख 28 नोव्हेंबर ते पाच डिसेंबर दरम्यान घडली असून विरली खुर्द येथील श्रीकांत गजानन हर्षे व 22 यांच्या तक्रारीवरून लाखांदूर पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध विविध कलमान्वये तारीख सहा डिसेंबर रोजी चोरीचा गुन्हा नोंदविला आहे