साक्री: महाविकास आघाडीकडून पिंपळनेर नगर परिषद नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराची घोषणा
Sakri, Dhule | Nov 8, 2025 आगामी पिंपळनेर नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष सज्ज झाले असून आपापल्या पक्षाकडून उमेदवारांची चाचपणी केली जात आहे महाविकास आघाडीच्या वतीने काँग्रेस,शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष यांच्या महाविकास आघाडी कडून पिंपळनेर नगरपरिषद नगराध्यक्ष पदासाठी डॉ.प्रतिभा चौरे-देशमुख यांच्या नावाची उमेदवार म्हणून सर्वानुमते घोषणा करण्यात आली आहे.यावेळी महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.