जालना: अवैध वाळू उत्खननाविरोधात प्रशासन आक्रमक; जिल्हाधिकारी आशिमा मित्तल व एसपी संधू यांची अचानक पाहणी
Jalna, Jalna | Jun 13, 2026 जालना जिल्ह्यात गौण खनिजाच्या अवैध उत्खनन, वाहतूक आणि साठवणुकीला आळा घालण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कठोर भूमिका घेतली असून, या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी आशिमा मित्तल आणि पोलीस अधीक्षक तेगबीर सिंग संधू यांनी मध्यरात्री अंबड तालुक्यातील गोंदी परिसराला अचानक भेट देऊन परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली. शनिवार दि. 13 जून 2026 रोजी सकाळी 9 वाजता मिळालेल्या माहितीनुसार या पाहणीदरम्यान अवैध वाळू उत्खनन आणि वाहतुकीसंदर्भातील हालचालींचा आढावा घेण्यात आला. तसेच महसूल, पोलीस यांनी भेटी दिल्या.