भंडारा: 'तू मारल्या सारखं कर, मी रडल्या सारखा करतो'; माजी आमदार वाघमारेंचा भाजप व शिवसेना विरोधातील वक्तव्य #Viral
भंडारा जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा भाजपचे विधान परिषदेचे आमदार डॉ. परिणय फुके व महायुतीच्या मित्र पक्षातील शिवसेनेचे भंडारा पवनी विधानसभा क्षेत्राचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्यात मागील काही दिवसांपासून राजकीय रस्सीखेच सुरू आहे. त्यांच्या सुरू असलेल्या भांडणात आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे भंडारा जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार चरण वाघमारे यांनी उडी घेतली आहे. राज्याच्या राजकारणात भाजप, शिवसेना व अजित पवारांची राष्ट्रवादी यांची युती आहे. मात्र भंडाराच्या राजकारणात तू मा