भोकरदन: पारध पोलीस ठाणे हद्दीत मोहळाई येथे पोलिसांनी व प्रशासनाने रोखला बालविवाह
आज दिनांक 27 एप्रिल 2026 वार सोमवार रोजी सायंकाळी 5 वाजता मिळालेल्या माहितीनुसार भोकरदन ता. पारद पोलीस ठाणे हद्दीत दिनांक 25 एप्रिल 2026 रोजी पारद पोलीस ठाण्याचे बीड जमादार कर्मचारी व प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांनी एका गावात बालविवाह रोखला आहे. 112 वर पोलिसांना कॉल आला होता की या गावात बालविवाह होत आहे, या कॉलवरून पोलिसांनी तात्काळ गावात धाव घेत मुलीच्या आई-वडिलांना सूचना पत्र व समजपत्र देऊन बालविवाह रोखला, यावेळी बीट जमादार प्रकाश शंकर सुरेश डुकरे ग्रामपंचायत अधिकारी बोरसे उपस्थित होते.