बदनापूर: सोमठाणा येथे पार पडला जागतिक हृदयविकार दिन
Badnapur, Jalna | Sep 30, 2025 आज दिनांक 30 सप्टेंबर 2025 वार मंगळवार रोजी रात्री8 वाजता बदनापूर तालुक्यातील सोमठाणा येथे सेवा पंधरवाडा या योजने अंतर्गत जागतिक हृदयविकार दिनानिमित्त जालना येथील प्रसिद्ध कलावती हॉस्पिटलचे हृदयविकार तज्ञ डॉक्टर कृष्णा कोरडे यांनी उपस्थित गावकऱ्यांना हृदयविकार संदर्भात योग्य ते मार्गदर्शन केले आहे ,याप्रसंगी बदनापूर अंबड विधानसभा मतदारसंघाचे भाजपा आमदार नारायण कुचे हे सुद्धा उपस्थित झाले होते तसेच गावकऱ्यांची सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थिती पाहायला मिळाली.