आदेश बिहामणे टोळीशी संबंधित असलेल्या सराईत गुन्हेगार संदीप सोमनाथ शेंडकर (वय २७, रा. दापोडे, ता. राजगड) याला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. २७ ऑक्टोबर २०२५ रोजी हवेली विभागात पेट्रोलिंगदरम्यान अमोल शेडगे आणि मंगेश भगत यांच्या गोपनीय माहितीनुसार राजगड-वेल्हा येथील कोळवडी कातवडी फाट्यावर सापळा रचून आरोपीला पकडण्यात आले.