धामणगाव रेल्वे: कॉटन मार्केट चौक तहसील कार्यालय येथे तालुका ओला दुष्काळग्रस्त घोषित करा ;वंचित बहुजन आघाडी चे तहसीलदार यांना निवेदन
तालुका ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना 50 हजार रुपये हेक्टरी मदत मिळणेबाबत मुख्यमंत्री व कृषिमंत्री महाराष्ट्र राज्य यांना तहसीलदार धामणगांव रेल्वे यांच्या मार्फत वंचित बहुजन आघाडी यांनी निवेदन सादर केले.धामणगांव रेल्वे तालुका हा प्रामुख्याने कृषिप्रधान असून येथे शेती हेच शेतकरी बांधवांचे प्रमुख उदरनिर्वाहाचे साधन आहे. गेल्या काही दिवसांपासून सतत कोसळणाऱ्या अती पावसामुळे संपूर्ण तालुक्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतातील उभ्या पिकांचे पाणी साचून नुकसान झाले .