वसई: विरारच्या फूलपाडा परिसरात राहणाऱ्या १३ वर्षांच्या अल्पवयीन मुलीचे अपहरण
Vasai, Palghar | Apr 19, 2024 विरारच्या फूलपाडा परिसरात राहणाऱ्या १३ वर्षांच्या अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याची घटना मंगळवारी संध्याकाळी घडली आहे. आरोपीने तिला कशाचे तरी आमिष दाखवून पळवून नेले आहे. मुलीच्या आईने बुधवारी विरार पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यावर अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. विरार पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.