शहरातील जिजामाता चौक परिसरातील श्रद्धा ज्वेलर्स या सराफा दुकानातून बुरखा घातलेल्या अज्ञात महिलेने लबाडीने सोन्याचे पेंडल चोरून नेल्याची घटना उघडकीस आली असून, या प्रकारामुळे व्यापारी वर्गात खळबळ उडाली आहे.याप्रकरणी दुकानमालक प्रतिक अनिल बागुल (वय २६, रा. नरसिंह कॉलनी, गंगापूर) यांनी गंगापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.