भोकरदन: मंत्र्यांच्या कर्मचाऱ्यांच्या चुकीमुळे काही रस्ते नॅशनल हायवेतून वगळले-मा.मंत्री रावसाहेब दानवे यांचे राजुर चौ.येथे मत
आज दिनांक 4 एप्रिल 2026 वार शनिवार रोजी दुपारी 4 वाजता भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या हस्ते विविध विकास कामाचे उद्घाटन राजूर चौफुली जालना शहरात करण्यात आले आहे याप्रसंगी व्यासपीठावर आमदार अर्जुन खोतकर यांच्यासह माहितीचे पदाधिकारी उपस्थित होते यावेळी बोलताना त्यांनी म्हटले आहे की, जालना भोकरदन हा नॅशनल हायवे आहे मात्र मधात 15 किलोमीटर कुंभारी फाटा ते राजुर हा वगळला आहे,आणि तो फक्त मंत्र्यांच्या कर्मचाऱ्यांमुळे वगळला आहे.