सडक अर्जुनी: नवेगावबांध येथे रक्तदान शिबिराचे आयोजन संपन्न
नवेगावबांध पर्यटन संकुल परिसरात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. गोंदिया वन विभाग, येथील वन्यजीव संरक्षण विभागाचे क्षेत्रसंचालक पियुषा जगताप (भारतीय वन सेवा), गोंदिया प्रादेशिक वन विभागाचे उपवनसंरक्षक पवनकुमार जोग, गोंदिया वन विभागाचे (वन्यजीव) विभागीय वनाधिकारी अतुल देवकर, नवेगाव नागझिरा व्याघ्र संरक्षण विभागाचे विभागीय वनाधिकारी दुर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली, येथील वन्यजीव व प्रादेशिक वनविभाग नवेगावबांध यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.