अकोला: जिल्हाधिकारी कार्यालयात अभिजात मराठीतील ग्रंथांचे प्रदर्शन
Akola, Akola | Sep 30, 2025 अभिजात मराठी सप्ताहनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात ३ ते ९ ऑक्टोबरदरम्यान अभिजात मराठीतील मौलिक ग्रंथांचे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. मायमराठीच्या प्राचीन साहित्याचा समृद्ध ठेवा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावा यासाठी राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या सूचनेनुसार हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये *प्रागैतिहासिक महाराष्ट्र*, *ज्ञानेश्वरी मुक्तचिंतन*, *श्री नामदेव गाथा*, गुणनंदींचे *यशोधरचरित्र* (इ. स. १५८१ मध्ये रचलेले) तसेच *महानुभाव सांकेतिक शिरलिपी* यांसारखे मौलिक ग्रंथ व पो