नागपूर ग्रामीण: मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली म्हणून वसतिगृहातून हकालपट्टी? नागपूरमधील धक्कादायक प्रकार
वसतिगृहातील उष्णतेचा त्रास कमी व्हावा आणि कुलर मिळावा म्हणून थेट मुख्यमंत्र्यांकडे दाद मागणाऱ्या विद्यार्थिनीला आता प्रशासनाच्या रोषाला सामोरे जावे लागत असल्याचा धक्कादायक प्रकार नागपूरमध्ये समोर आला आहे. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर वसतिगृहाला कुलर तर मिळाले.