जळगाव शहरातील नवीन बसस्थानक येथे बसमध्ये चढत असतांना पाचोरा येथे राहणाऱ्या एका ५८ वर्षीय महिलेच्या गळ्यातील सुमारे ५० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र अज्ञात चोरट्याने हातचलाखीने चोरून नेल्याची घटना बुधवारी १२ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी दुपारी ४ वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.