धरणगाव येथे बेकायदेशीररीत्या वास्तव्य करणाऱ्या इराणी महिलेच्या प्रकरणात आता एक खळबळजनक वळण मिळाले आहे. या प्रकरणातील संशयितांनी पाकिस्तानमध्ये आंतरराष्ट्रीय 'व्हॉट्सॲप कॉल' केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणातील तिसऱ्या आरोपीला तेलंगाना राज्यातून अटक केली आहे, अशी माहिती ॲड. गजानन पाटील आणि संदीप पाटील यांनी शनिवारी, १७ जानेवारी रोजी दुपारी २ वाजता दिली.