रत्नागिरी : टीबी मुक्त भारत अभियानांतर्गत ग्रामपंचायत तळवडे येथे एक्स-रे तपासणी शिबिराचे यशस्वी आयोजन
531 views | Ratnagiri, Maharashtra | Aug 7, 2025 या शिबिराचे उद्घाटन ग्रामपंचायत तळवडे येथील सरपंच सौ. गायत्री साळवी, उपसरपंच शांताराम साळवी उपस्थितीत पार पडले.जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. महेंद्र गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली टीबी मुक्त भारत अभियान कार्यक्रमाअंतर्गत सदर शिबिराच्या आयोजनासाठी पीपीएम कोऑर्डिनेटर श्रीकांत सावंत,जिल्हा सुपरवायझर मंगेश पाटील, एक्स-रे टेक्निशियन श्रीहांगे,एसटिएस राहुल कोकणे, एसटिएलएस श्रीमती आचल मळेकर,तसेच राजापूर क्षयरोग पथक आणि प्राथमिक आरोग्य केंद्र करत कारवली तिठा येथील आरोग्य सहाय्यक टी. बी. पाटील, के. व्ही. भांडे, आरोग्य सहायिका श्रीमती पाटणकर यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.एकूण 185 रुग्णांची एक्स-रे व सीवायटिबी (CYTB)चाचणी करण्यात आली.