मोहोळ: सीना नदी महापूर : सोलापूर-पुणे महामार्गावरील लांबोटी पूलावरून एकेरी वाहतूक सुरु
Mohol, Solapur | Sep 25, 2025 सोलापूर जिल्ह्यातील सेना नदीला आलेल्या महापुरामुळे सोलापूर-पुणे महामार्गावरील लांबोटी येथील पुलावरून वाहतूक बंद करण्यात आली होती. दरम्यान, आज गुरुवार दि. २५ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी नऊ वाजल्यापासून या पुलावरून एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. सीना नदीला आलेल्या महापुरामुळे लांबोटी येथील पुलाजवळ पाणी आल्याने प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून वाहतूक बंद केली होती. मात्र आज सकाळपासून पुलावरील पाण्याचा जोर ओसरल्यानंतर एकेरी वाहतुकीस परवानगी देण्यात आली आहे.