तुमसर: डोंगरी बु. मायलमध्ये कंत्राटी कामगारांचा एल्गार; वेतन कपात व जाचक अटींविरोधात 'काम बंद' आंदोलन!
तुमसर तालुक्यातील डोंगरी बु. येथील 'मायल' प्रकल्पात कार्यरत असलेल्या कंत्राटी कामगारांनी आज, दि. २० जानेवारी रोज सोमवारला सकाळी ८ वा. पासून प्रशासनाच्या अन्यायकारक धोरणांविरोधात पहिल्या पाळीपासून काम बंद आंदोलन पुकारले आहे. मायलमध्ये ऑपरेटर, चालक आणि हेल्पर म्हणून शेकडो कामगार कंत्राटी तत्त्वावर सेवा देत आहेत. मात्र, मागील महिन्यात नियुक्त झालेल्या नवीन कंत्राटदाराने पदभार स्वीकारताच कामगारांचे शोषण सुरू केल्याचा आरोप होत आहे.