नागपूर ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने कौंढाळी आणि वर्धा जिल्ह्यातील कारंजा घाडगे येथील घरफोडीचे दोन गुन्हे उघडकीस आणले आहेत. या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. कोंढाळी येथील रहिवासी गुलाब चन्ने यांच्या घरी २५ डिसेंबर रोजी घरफोडीचा प्रयत्न झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी तपास करून आरोपींना अटक केली. अटक केलेले आरोपी अंश उर्फ अंशुल नितीन गजभे,आर्यन मदन मेश्राम हे आहे.