सेनगाव: हत्ता तांडा येथून मुलगा बेपत्ता, सेनगांव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल
सेनगांव तालुक्यातील हत्ता तांडा येथून एक 15 वर्षीय मुलगा बेपत्ता झाल्याची घटना घडली असून या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.तर याप्रकरणी सेनगांव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. हत्ता तांडा येथील रहिवासी असलेले विलास रामराव राठोड यांचा मुलगा इंद्रजीत याचा कुटुंबीयांसह नातेवाईकांनी शोध घेतला मात्र तो मिळून न आल्याने सदर बेपत्ता मुलास अज्ञात इसमाने कशाचे तरी अमिष दाखवून फुस लावून पळवुन नेल्याची तक्रार सेनगांव पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली.