जालना: आंदोलन महागाईविरोधात की आपापसात?; जालन्यात काँग्रेसच्या ‘मेलेडी’ आंदोलनात गटबाजी उघड
Jalna, Jalna | May 26, 2026 पेट्रोल-डिझेल दरवाढ, इंधन तुटवडा आणि वाढत्या महागाईविरोधात काँग्रेसकडून जालन्यात करण्यात आलेल्या अनोख्या ‘मेलेडी’ आंदोलनाची जिल्हाभर चर्चा रंगली असतानाच, आता या आंदोलनातून काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आल्याची चर्चा सुरू झाली आहे. मंगळवार दि. 26 मे 2026 रोजी दुपारी 12 वाजता गांधी चमन येथे आंदोलन एकच असले तरी त्याठिकाणी झळकलेल्या दोन वेगवेगळ्या बॅनर्समुळे काँग्रेसमधील दोन गट स्पष्टपणे समोर आल्याचे चित्र दिसून आले. जालन्यातील या आंदोलनादरम्यन दोन बॅनर झळकले.