अचलपूर: देवमाळी ग्रामपंचायतीचा नगरपरिषदेत समावेशाला ग्रामसभेचा विरोध; ग्रामसभेत ६ प्रस्तावावर चर्चा
अचलपूर पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या देवमाळी ग्रामपंचायतीची विशेष ग्रामसभा आज १७ सप्टेंबर रोजी घेण्यात आली. सभेत एकूण सहा प्रस्तावांवर चर्चा झाली. यामध्ये ग्रामपंचायत नगरपरिषदेत समाविष्ट करण्याच्या सहाव्या प्रस्तावावर सर्वाधिक चर्चा झाली. बहुमताने ग्रामस्थांनी या प्रस्तावाला विरोध दर्शविला. या प्रस्तावाबाबत नागरिकांनी विचारणा केली असता, देवमाळी येथील भाजपा पदाधिकारी शर्मा यांनी अर्ज दिल्याची माहिती देण्यात आली. त्यानंतर नागरिकांच्या मागणीनुसार अन्य अर्जदारांची नावे जाहीर करण्यात आली. य