भोकरदन: जाळीचादेव गाव परिसरात दिवसाढवळ्या अस्वलाचा वावर, स्थानिक रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण
आज दिनांक 16 जून 2026 वार मंगळवार रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास भोकरदन तालुक्यातील तीर्थक्षेत्र जाळीचा देव येथे दिवसाढवळ्या अस्वलाचा वावर असल्याचे पाहायला मिळाले आहे, हा अस्वल चक्क मानवी वस्ती कडे वाटचाल करत असताना यावेळी त्या ठिकाणी उपस्थित असलेले रहिवासी विजय गायकवाड व त्यांच्या परिवारांनी हे अस्वलाला हाकलून लावले आहे, मात्र या अस्वलाच्या भीतीपोटी गावात रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे.