नागपूर शहर: कबाडीचे काम करणाऱ्याला मारहाण करून लुटणाऱ्या दोन कुख्यात आरोपींना अटक : सतीश आडे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कपिल नगर
कपिल नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश आडे यांनी 22 ऑक्टोबरला सायंकाळी 6 वाजता दिलेल्या माहितीनुसार, कबाडीचे काम करणाऱ्याला मारहाण कडून लुटणाऱ्या दोन कुख्यात आरोपींना कपिल नगर पोलिसांनी अटक केली आहे. अटकेतील दोन्ही आरोपी कुख्यात आरोपी असून त्यांच्यावर गुन्हे दाखल आहे. दरम्यान आरोपींनी बहाण्याने त्या व्यक्तीला थांबविले आणि त्याला मारहाण करून त्याच्या खिशातले पैसे काढून घेतले याप्रकरणी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहे.