रत्नागिरी : ज्ञानदीप इंग्लिश मिडीअम स्कुल बोरज, ता. खेड येथे एच पी व्ही लसीकरण मोहीम यशस्वी... 104 मुलींनी घेतली लस...
276 views | Ratnagiri, Maharashtra | Nov 25, 2025 मा जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ अनिरुद्ध आठल्ये व तालुका आरोग्य अधिकारी शैलेश खरटमोल यांच्या मार्गदर्शनाखाली दि 25/11/2025 रोजी प्रा.आ.केंद्र शिव बु.!! उपकेंद्र मोरवंडे अंतर्गत ज्ञानदीप इंग्लिश मीडियम स्कूल,बोरज येथे 9 ते 14 वयोगटातील मुलींना HPV लसीकरण करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना प्रा.आ.केंद्र शिव बु.!! चे वैद्यकीय अधिकारी डॉ कांबळे यांनी HPV लसींबाबत माहीती दिली व लसीकरणापूर्वी किरकोळ तपासणी करून लसीकरण करण्यात आले. यावेळी डॉ कांबळे (मा.वैद्यकीय अधिकारी) शिक्षकवृंद, श्रीमती डी डी पांचाळ,सर्व समुदाय अधिकारी,आरोग्य सेविका,आरोग्य सेवक,आशा स्वंयसेविका,मदतनीस phc वाहनचालक व बाई रतनबाई घरडा हॉस्पिटल येथील अँब्युलन्ससह उपस्थित होते.