महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने नागपूर शहर पोलीस सतर्क असून अवैध धंद्यांवर पोलिसांची नजर आहे अशातच आज बजाज नगर पोलिसांनी अवैध दारू साठा जप्त केला आहे. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे बजाज नगर पोलिसांनी पी व्ही के वाईन शॉप जवळ उभ्या असलेल्या काळ्या रंगाच्या थार वाहनाची पाहणी केली असता त्यामध्ये विदेशी दारू व बियर चा अवैध दारू साठा मिळून आला. तब्बल एक लाख 16 हजार 290 रुपयांच्या दारू पेट्या व एक थार असा माल जप्त केला.