सातारा: क्षेत्रमाहूली येथील 55 वर्षे व्यक्तीचा जैतापूर हद्दीत कृष्णा नदी पात्रात बुडून मृत्यू झाल्याची तालुका पोलीस ठाण्यात नोंद
Satara, Satara | Sep 21, 2025 जीवन श्रीरंग सावंत, वय 55 वर्ष राहणार क्षेत्रमाहूली, तालुका जिल्हा सातारा, हे शनिवार दिनांक 20 सप्टेंबर रोजी, दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास, मौजे जैतापूर तालुका जिल्हा सातारा, गावाच्या हद्दीतील कृष्णा नदीच्या पात्रात तरंगताना दिसून आले, त्यांना तातडीने येथील नागरिकांनी जिल्हा शासकीय रुग्णालय घेऊन गेले, यावेळी येथील डॉक्टरांनी, त्यांना तपासून पाहिले व उपचारा पूर्वी मृत्यू झाल्याचे सांगितले, या घटनेची, सातारा तालुका पोलीस ठाण्यात पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे.