भद्रावती: मोकळ्या जमिनीचे अतिक्रमणधारकांना पट्टे द्या.
भाजप शहराध्यक्ष नामोजवार यांचे आ. देवतळे यांना निवासस्थानी निवेदन.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात घरकुल योजना राबविली मात्र ज्यांच्याजवळ जमीन नाही त्यांना या योजनेचा लाभ मिळत नाही.त्यामुळे शहरातील सुमठाणा, विंजासन आदी भागितील झुडुपी जंगल व गायरानासाठी असलेली जमीन महसूल विभागाला हस्तांतरीत करुन त्या जमिनीचे पट्टे जमीन नसलेल्या नागरिकांना द्यावे.असे निवेदन भाजप शहराध्यक्ष सुनील नामोजवार यांनी आ. करण देवतळे यांना त्यांच्या निवासस्थानी सादर केले आहे.