अमरावती: टप्पा वाढीवरील शिक्षकांची दिवाळी गोड केल्याबद्दल दिवाळीच्या पूर्वसंध्येला संगीता शिंदे यांनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार
टप्पा वाढीवरील शिक्षकांच्या खात्यात दिवाळीपूर्वी वाढीव टप्प्यानुसार पगार वितरित झाल्याबद्दल भाजपा शिक्षक आघाडीच्या संयोजिका डॉ.सौ. संगीताताई शिंदे ( बोंडे) यांनी दीपावलीच्या पूर्वसंध्येला राज्याचे मुख्यमंत्री श्री.देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची नागपूर निवासस्थानी भेट घेऊन त्यांचे आभार मानले. यावेळी राज्यसभा खासदार डॉ.अनिल बोंडे, डॉ.सौ. वसुधा बोंडे मॅडम, श्री संत गाडगे बाबा धर्मशाळेचे मुख्य व्यवस्थापक श्री प्रशांत दादा देशमुख आदींची उपस्थिती होती.