जालना: जालना मनपाच्या लाचखोर अधिकाऱ्यांना न्यायालयीन कोठडी.
४० हजारांच्या लाच प्रकरणात दोन्ही आरोपींना १२ जूनपर्यंत कारावास;
Jalna, Jalna | Jun 1, 2026 जालना मनपाच्या लाचखोर अधिकाऱ्यांना न्यायालयीन कोठडी. ४० हजारांच्या लाच प्रकरणात दोन्ही आरोपींना १२ जूनपर्यंत कारावास; ACB तपास सुरू.. आज दिनांक 1 शंभर रोजी दुपारी 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील बहुचर्चित लाचखोरी प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. जालना महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागातील दोन अधिकाऱ्यांना ४० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आल्यानंतर आता न्यायालयाने दोघांनाही १२ जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.