धानोरा: कटेझरी पोलिसांनी दाखवले माणुसकीचे दर्शन वृद्ध महिलेस केली मदत
कटेझरी पोलिसांनी गावातील वयोवृद्ध महिला शिरजाबाई रामटेके यांचे राहते घर पावसामुळे गळत होते त्यांना सांभाळ करणारे कोणीही नसून ती एकटीच वृद्ध महिला घरी राहत होती त्यामुळे एक जून रोजी सकाळी 11 वाजता पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी अजय भोसले यांनी स्वखर्चाने ताडपत्री आणून वयोवृद्ध महिलेच्या घरावर टाकून दिले.