भोकरदन: कोठा ज.येथे अवैध दारू विक्री बंद करण्यासाठी महिलांनी व ग्रामपंचायत अधिकारी यांनी कसली कंबर,पोलीस ठाणे येथे दिले निवेदन
आज दिनांक 8 जुलै 2026 वार बुधवार रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास भोकरदन तालुक्यातील कोठा जहागीर येथील शेकडो महिलांनी व ग्रामपंचायत अधिकारी यांनी गावात सुरू असलेले अवैद्य दारू विक्री बंद करण्यासाठी कंबर कसली आहे, मागील काही दिवसापासून गावात दारू विक्रीमुळे तरुण मंडळी व्यसनाधीन होत आहे, त्यामुळे पोलिस ठाणे ,विभागीय अधिकारी ,दारूबंदी विभाग यांना दारूबंदी करण्यासंदर्भात निवेदन देऊन मागणी केली आहे, अशी माहिती ग्राम पंचायत अधिकारी यांनी दिली आहे.