भंडारा: “स्वस्थ नारी, सशक्त परिवार” अभियानाचा जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथे शुभारंभ
भारत सरकार व राज्य शासनाच्या सहकार्याने व आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली “स्वस्थ नारी, सशक्त परिवार ” हे विशेष राष्ट्रीय अभियान १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२५ दरम्यान भंडारा जिल्ह्यातील सर्व उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रात राबविण्यात येणार आहे. या अनुषंगाने आज बुधवार दिनांक १७ सप्टेंबर रोजी दुपारी १२ ते २:३० वाजता दरम्यान जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथे उभारलेल्या भव्य मंडपात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उद्घाटन....