पालघर: राहुल गांधींची जीएसटी बाबतची भूमिका दुटप्पी- भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये
राहुल गांधींची जीएसटी बाबतची भूमिका दुटप्पी असल्याची टीका भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केली आहे. 2017 मध्ये जीएसटी आल्यानंतर त्यांनी याला गब्बरसिंग टॅक्स आणला असे म्हटले, त्यानंतर आता आम्ही जीएसटीबाबत काही सुधारणा सुचवल्या असल्याचे राहुल गांधी म्हणतात त्यामुळे राहुल गांधींची भूमिका नेहमीच दुटप्पी असते असे भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये म्हणाले आहेत.