फलटण: मलठण येथील अनाथाश्रमातून ३५ वर्षीय व्यक्ती झाली बेपत्ता
आई अनाथाश्रम मलठण फलटण येथून ३५ वर्षीय व्यक्ती बेपत्ता झाल्याची घटना घडली आहे. याबाबत फलटण शहर पोलीसांनी सांगितले की आई अनाथाश्रम मलठण फलटण येथून बुधवार दि. ४ सप्टेंबरला सकाळी ९ वाजता परशुराम (वय ३५ पूर्ण नाव माहीत नाही) ही व्यक्ती कोठे तरी निघून गेली. त्यांचा परिसरात अनाथाश्रम कर्मचारी यांनी शोध घेतला मात्र व्यक्ती मिळून आली नाही. याबाबत फलटण शहर पोलीस ठाण्यात खबर दिली असून फलटण शहर पोलीस अधिक तपास करीत आहेत