कारंजा: स्क्रब टायफस’चा शिरकाव : नागरिकांनी घाबरू नका, खबरदारी घ्या !
मुख्य कार्यकारी अधिकारी व आरोग्य अधिकारी यांचे आवाहन
Karanja, Washim | Oct 18, 2025 जिल्ह्यामध्ये ‘स्क्रब टायफस’ या दुर्लक्षित परंतु गंभीर आजाराचा शिरकाव झाला असून संभाव्य धोका लक्षात घेता, जिल्हा आरोग्य विभागाने तातडीने जनजागृती मोहीम सुरू केली आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चव्हाण यांनी जनतेला या आजाराच्या लक्षणांबाबत व प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत जागरूक राहण्याचे कळकळीचे आवाहन केले आहे. तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पी. एस. ठोंबरे यांनी आरोग्य विभागाला हा आजार पसरू नये म्हणून तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्याचे आदेश दिले.