बीड बस स्थानकात 10 ते 21 नोव्हेंबर दरम्यान बस स्थानक सर्वेक्षण होणार विभाग नियंत्रक अनुज्या दुसाने यांची माहिती
Beed, Beed | Nov 10, 2025 राज्य परिवहन महामंडळातर्फे "हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियान" राबविण्यात येत आहे. बीड विभागातील 'ब' आणि 'क' वर्ग बसस्थानकांचे तिसरे सर्व्हेक्षण १० ते २१ नोव्हेंबरदरम्यान होणार असून, नाशिक येथील मुल्यांकन समिती हे सर्व्हेक्षण करणार आहे. या पार्श्वभूमीवर बीड आगार प्रशासन स्थानक परिसराची धूळ झटकण्यासाठी स्वच्छतेच्या कामाला लागले आहे. स्वच्छतागृहांची सखोल साफसफाई, परिसरातील गवत काढणे आणि पथदिव्यांची दुरुस्ती अशी कामे गतीने सुरू आहेत.