अंजनगाव सुर्जी: टुनकी सोनाळा रोडवर भीषण अपघात; अंजनगाव सुर्जी येथील केळीने भरलेला आयशर ट्रक पलटी; २ मजूर ठार,५ जखमी
संग्रामपूर तालुक्यातील टुनकी–सोनाळा मार्गावर ११ ऑक्टोबर रोजी रात्री सुमारे १०:३० वाजताच्या सुमारास अंजनगाव सुर्जी येथील केळीने भरलेला आयशर ट्रक पलटी होऊन झालेल्या भीषण अपघातात दोन मजुरांचा जागीच मृत्यू झाला,तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत.मिळालेल्या माहितीनुसार, एमएच-४८ एवाय-४८१५ क्रमांकाचा आयशर ट्रक जळगाव जामोद परिसरातून केळी घेऊन अंजनगावकडे निघाला होता. मात्र टुनकी–सोनाळा रोडवरील वळणावर चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने ट्रक रस्त्याच्या कडेला उलटला.