राजुरा पोलीस स्टेशन हद्दीतील मौजा हरदोना (बुज) येथे झालेल्या खुनाच्या प्रकरणातील अज्ञात आरोपीचा उलगडा अवघ्या एका तासात करून दोन्ही आरोपींना हत्यारासह ताब्यात घेण्यात आज दि 6 डिसेंबर ला सकाळी 9 वाजता राजुरा पोलीस स्टेशनच्या डीबी पथकाला यश मिळाले आहे. पतीच्या हत्या प्रकरणात पत्नी व तिचा प्रियकर दोघांनी मिळून गुन्हा केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.