नागपूर शहर: ॲक्टीव्हावर धामण सापाचा क्रूर स्टंट ; अवस्थी नगर येथील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला एक व्हिडिओ हाती आलेला आहे. नागपूरच्या अवस्थे नगर परिसरात दोन तरुणांनी धामण प्रजातीच्या सापासोबत अॅक्टिवा गाडीवर स्टंट आणि प्रदर्शन केल्याचा हा व्हिडिओ आहे. यातील एका तरुणाने धामण प्रजातीचा साप आपल्या गळ्यात टाकला आहे. या सापाचे तोंड क्रूरपणे हातात दाबून धरले आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल झाला पशु प्रेमींनी या तरुणांवर कार्यवाही करण्याची मागणी केली आहे