चिंचखेडा बुद्रूक येथे रस्त्यावर मुरुम टाकण्याच्या वादातून दोन गटात कडाक्याचे भांडण होऊन तुंबळ हाणामारी झाली. या घटनेत परस्पर शिवीगाळ, मारहाण तसेच जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या. अविनाश थेटे यांनी पवार गटातील १२ जणांवर काठीने मारहाण करून जखमी केल्याची तक्रार दिली. तर दुसऱ्या गटातील चंद्रकलाबाई पवार यांनी थेटे गटातील १३ जणांनी मारहाण व धमक्या दिल्याचा आरोप केला. दोन्ही फिर्यादीत काठीने मारहाण करून महिलांना जखमी केल्याचे नमूद आहे.