शेगाव: मच्छिंद्र खेड येथे जवायाने सासुरवाडीत वाद करून शिवीगाळ करून मारहाण केली
पत्नीला माझ्या घरी का पाठवत नाही असे म्हणून जवायाने सासुरवाडीत वाद करून शिवीगाळ करून मारहाण करण्याची धमकी देऊन तसेच घरातील साहित्याची तोडफोड करून नुकसान केल्याची घटना मच्छींद्रखेड येथे १८ ऑक्टोंबर रोजी रात्री ८ वाजे दरम्यान उघडकीस आली आहे.याबाबत विजय सोनाजी ससाने वय ४५ वर्ष राहणार मच्छर्चीद्रखेड यांनी दिलेल्या तक्रारीवरून जलम पोलिसांनी आकाश रामदास अंभोरे वय 31 वर्षे,, रा. सोनाळा ता अकोला याच्या विरुद्ध कलम ११८ (१), ३५१ (२), २९६, ३२४ (२) बीएनएस अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे .