देऊळगाव राजा: तहसील कार्यालय येथे दिव्यांगांनी कागदपत्रे त्वरित जमा करावीत -तहसीलदार वैशाली डोंगरजाळ यांचे आवाहन
तहसील कार्यालय येथे दिव्यांगांनी कागदपत्रे त्वरित जमा करावीत -तहसीलदार वैशाली डोंगरजाळ यांचे आवाहन देऊळगाव राजा (दिनांक 15 ऑक्टोंबर ४ वाजता) संजय गांधी निराधार योजनेतील दिव्यांग (अपंग) लागर्थ्यांना शासनाने अडीच हजार रुपयांचे मानधन देण्याचा निर्णय घेतला आहे. दिव्यांग लाभार्थ्यांनी आपले ऑनलाईन दिव्यांग (अपंग) प्रमाणपत्र, अपडेट केलेले आधार कार्ड, बँक पासबुक सर्व कलर (रंगीत)छायांकित प्रत संजय गांधी निराधार विभाग तहसील कार्यालय दे . राजा येथे जमा करावे. असे आवाहन तहसीलदार डोंगरजाळ केले