नांदेड: बेलानगर चौरस्त्यात तु इथे कसा काय आला म्हणून झोमॅटो डिलीवरी बाॅयची स्कुटी अडवून ५ आरोपींनी मारहाण करून लुटले;गुन्हा दाखल
Nanded, Nanded | Sep 15, 2025 नांदेड शहरातील बेलानगर चौरस्ता येथे दि १२ सप्टेंबर २०२५ रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास यातील आरोपी १) अक्षय पांढरे २) बुद्धभुषण गोडबोले व इतर तीन विधी संघर्ष बालक असे पाच आरोपींनी मिळुन फिर्यादी योगेश पंडीतची स्कुटी क्रमांक एमएच २६ सी जी ७५६५ हि अडवून चावी फेकुन दिली व पंडित यास म्हणाले की, तु येथे कसा काय आला म्हणून मारहाण करून जबरीने साडेपाच हजार रुपये काढून पळून गेले. याप्रकरणी भाग्यनगर पोलीस ठाण्यात आज दुपारी गुन्हा दाखल झालेला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शिंदे आज करीत आहेत.