भोकरदन: पारध शाहू राजा येथे आगीमोहोळं हल्ल्यात पाच जण जखमी
आज दिनांक 6 एप्रिल 2020 वार सोमवार रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास भोकरदन तालुक्यातील पारध शाहू राजा येथे आगी मोहोळाच्या मधमाशांच्या हल्ल्यात 5 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. जिल्हा परिषद शाळेच्या परिसरात असलेल्या एका बिल्डिंगवर हे आगी मोहोळ बसले होते आणि उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे या मधमाशांनी अचानक हल्ला करत पाच नागरिकांना जखमी केली असून यामुळे नागरिक सावराबावडा बाळाला लागले या हल्ल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे.