तालुक्यातील मौजे बक्तरपूर ते मजलेशहर या गावांना जोडणारा गाव नकाशातील शासकीय रस्ता तात्काळ खुला करण्यात यावा, या मागणीसाठी आज बक्तरपूर येथील स्थानिक रहिवाशांनी शेवगाव तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. हे उपोषण वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष प्रा. किसन चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आले आहे.