खैरी वलमाझरी येथे ग्रामपंचायत च्या वतीने संविधान दिनानिमित्त वक्तृत्व,निबंध,पोस्टर बॅनर प्रदर्शन,स्वच्छता उपक्रम,केंद्र व राज्य शासनाच्या जनहितार्थ योजनांचे मार्गदर्शन,संविधान प्रस्तावना सामूहिक वाचन अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन करून संविधान दिन बुधवार दि 26 नोव्हेंबरला दुपारी तीन वाजता ग्रामपंचायत येथे साजरा करण्यात आला.सरपंच पुरुषोत्तम रूखमोडे,उपसरपंच सत्यपाल मरसकोल्हे तसेच ग्रामपंचायत अधिकारी नरेश शिवणकर ग्रामपंचायत सदस्य व अधिकारी कर्मचारी व नागरिक यांची उपस्धिती होती